Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा, पक्षाने जाहीर केली भूमिका; स्पष्टच सांगितले, 'त्या' ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स...

NCP Devram Lande : कथित व्हिडओ आणि ऑडिओ क्लिपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही अनुचित प्रकारांचे पक्ष कधीही समर्थन करत नाही.

Roshan More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम सखाराम लांडे आणि एका अनोळखी व्यक्तीमधील कथित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. 10 कोटी रुपयांच्या बदल्यात आदिवासींच्या जमीन मिळवून देण्याचे आश्वासन लांडे देत आहे. यामध्ये क्लिपमध्ये लांडे हे अनेक मोठ्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य देखील करत असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा लांडे यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या क्लिप्सची सकृतदर्शनी सत्यता तपासणे अत्यंत गरजेचे असले, तरी अशा कोणत्याही अनुचित प्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करत नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्ष कोरेकर यांनी केलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे की, 'जुन्नर तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी स्व. अजितदादा व माजी आमदार स्व. वल्लभ शेठ बेनके यांनी घालून दिलेल्या मापदंडावर निरपेक्षपणे काम करत आहेत. एखाद्या कार्यकर्त्याच्या वैयक्तिक कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला कोणताही धक्का लागू नये, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती करत आहोत.'

लांडेकडे खुलासा मागितला

'या प्रकरणामध्ये कोणाला हेतुपुरस्सर अडकवण्याचा (ट्रॅप करण्याचा) प्रयत्न झाला असेल किंवा यात काही तथ्य नसेल, तरीही सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे; आणि जर कोणी खरोखर दोषी आढळले, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी, हीच पक्षाची ठाम भूमिका आहे. या संदर्भात पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर व माजी आमदार अतुल बेनके यांनी देवराम लांड यांच्याकडे तात्काळ खुलासा मागवला होता. पक्षाची विचारधारा, पक्षशिस्त अबाधित राहावी आणि पक्षाची प्रतिमा मलिन न होता या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा, या उद्देशाने देवराम लांडे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.', असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT