Sangli Shirala Zilla Parishad Election Politics sarkarnama
महाराष्ट्र

NCP- BJP Shirala Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताच भाजप-शिवसेनेच्या पद्धतशीर चाली ; माजी आमदारांच्या गटालाच सुरुंग

BJP Shiv Sena strategy : शिराळ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आघाडी जाहीर करताच भाजप-शिवसेनेने रणनीतिक चाली रचायला सुरुवात केली आहे. चिन्ह आणि उमेदवाराच्या अंतिम घोषणेकडे सर्वांचे लक्ष.

सरकारनामा ब्युरो

शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम आघाडी अस्तित्वात आहे. स्थानिक पातळीवर या आघाडीने निर्माण केलेल्या नवीन समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अद्याप कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे, याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप जाहीर केले नाही. पण जतनंतर शिराळ्यातही ‘घड्याळ’ चिन्हावरच उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील हालचालींनी गती घेताच शिवसेना - भाजपनेही पद्धतशीर चाली रचायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने आघाडीची घोषणा केली असली तरीही अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. उलट महायुतीने शिवसेनेच्या पृथ्वीसिंग नाईक यांची उमेदवारी जाहीर करून प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे.

या ताकदीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी महायुतीच्या सर्व यंत्रणा सतर्क करून त्या पद्धतीने प्रचाराची रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांच्या प्रचारात त्यांचे विरोधक असणारे सासरे विश्वास कारखान्याचे संचालक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे समर्थक विश्वास कदम यांना प्रचार यंत्रणेत सहभागी करून घेतले आहे.

राष्ट्रवादीची आघाडी जाहीर करताना स्थानिक नेत्यांनी विकासाचा अजेंडा पुढे ठेवला असून, राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून स्थिर आणि सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार केला आहे. मात्र या सर्व घोषणांमध्ये चिन्हाचा आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. या अंतिम घोषणेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT