Shiv Sena Alliance : दिवंगत नेत्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र; ठाकरेंच्या आमदाराचा शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

political twist in Maharashtra : महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड! दोन्ही शिवसेना एकत्र येत असल्याची जोरदार चर्चा. खरंच युती झाली का? वाचा पडद्यामागची गोष्ट.
Uddhav thackeray eknath shinde
Uddhav thackeray eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि शिवसेनेचे दोन भाग पडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊ केले. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्यनेता एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय वैर देखील टोकाला पोचली असल्याचं पाहायला मिळालं.

अशा या राजकीय परिस्थितीमध्ये जर कोणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याचं सांगितलं तर कोणालाही विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी करून दाखवली आहे. राजकीय पटलावर कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे हेच या घटनेवरून सिद्ध झालं आहे. कारण ठरलंय पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळालं आहे.

चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना सोबत आल्याचे पाहायला मिळालं. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येणाऱ्या काळात राजकारण बदलणारी ठरणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

चाकणमधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय विश्लेषकांना भुवाया उंचावल्या आहेत. चाकण नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ही दोन्ही शिवसेना मधील युती पाहायला मिळाली. मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्हीही नेते सोबत आल्याचं पाहायला मिळाले.

Uddhav thackeray eknath shinde
Pune Congress : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचा 'मास्टरस्ट्रोक'! घराणेशाहीच्या आरोपांवर सडेतोड उत्तर! 'या' नव्या धोरणामुळे दिग्गजांना धक्का?

याबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे म्हणाले, 'खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली नगरपालिका निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या असून अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून पाठिंबा दिला आहे. मात्र ही युती नाही. असं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले आहे.'

Uddhav thackeray eknath shinde
Uddhav Thackeray News : शिंदेसेनेच्या विरोधानंतरही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच दिला 'तो' मान; निवडणुकीच्या तोंडावर निर्णय...

तर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सांगितलं की,'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्षपदापुरता मर्यादित असून तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी या नगरपंचायती आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केल आहे'. त्यामुळे चाकण मधील शिवसेनेची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com