Sunetra Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics : राष्ट्रवादीला अर्थखाते देण्यास CM फडणवीसांकडून टाळाटाळ? सत्य वेगळेच; शिंदेंच्या मंत्र्याचा गौप्यस्फोट, 'खाते...'

NCP Finance Portfolio Pratap Sarnaik : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखाते पुन्हा मिळावे यासाठी आग्रह धरला जातो आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाते देण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्री सरनाईक यांनी वेगळीच माहिती दिली आहे.

Roshan More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्थखाते पक्षाला पुन्हा मिळावेत यासाठी आक्रमक आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवास्थानी देखील बैठक झाली. या बैठकीत देखील आमदारांनी अर्थखाते पक्षाला पुन्हा मिळाले पाहिजे, ही भावना बोलून दाखवली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाते देण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा होती. मात्र, फडणवीस हे खाते का देत नाही याचे कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

सरनाईक म्हणाले, 'त्यांच्या (राष्ट्रवादीच्या) शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, दुष्काळाच्याआधीच ते निर्णय घेणार होते. पण दुष्काळाच्या दरम्यान जो निधी आहे त्या निधीचे योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना थोडं थांबवलं आहे. आणि स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचच ते खातं आहे. त्यांनाच ते मिळणार आहे.'

पुढे बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, अर्थखाते हे राष्ट्रवादीचेच आहे. पण ते त्यांनी कधी देतायेत हे मुख्यमंत्रीवर अवलंबून आहे.

आमच्या हक्काच मिळावं...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण म्हणाले, अजितदादांना, राष्ट्रवादीला अर्थखातं देण्यात आले होते. आमची मागणी हीच आहे की, अर्थखाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. ते राष्ट्रवादीला देण्यात यावे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्यासोबत काम करणारे आम्ही लोक आहोत. आमच्या वाट्याचं, हक्काच आम्हाल भेटलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT