NCP News: राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची शहांसोबत बैठक; आता सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांना 'देवगिरी'वर बोलावलं

NCP MLA meeting: विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींचा धुराळा बसल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे. दिल्लीतील घडामोडींनंतर सुनेत्रा पवारांची आता देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना देवगिरीवर बैठकीसाठी बोलावलं आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या निधनानंतर भाजप अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेलेलं अर्थखातं पुन्हा मिळवण्याच्या उद्देशानं आग्रही भूमिकेत दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील घडामोडींनंतर आता पुन्हा मुंबईतही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली सुरू आहे. याचदरम्यान, एका माजी मंत्र्याचं लवकरच मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. दिल्लीतील घडामोडींनंतर सुनेत्रा पवारांनी आता देवगिरी बंगल्यावर एकीकडे प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी (ता.3नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावलं आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींचा धुराळा बसल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे इतर सात दिग्गज नेत्यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी(ता.2)कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू होती. या बैठकीला छगन भुजबळ,प्रफुल्ल पटेल,धनंजय मुंडे उपस्थित हे प्रमुख नेते उपस्थित होते. याआधी भुजबळांच्या सातपुडा निवासस्थानी अमित शहांच्या भेटीसाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्याचं लवकरच मंत्रिमंडळात कमबॅक होणार आहे. राष्ट्रवादीतील वरिष्ठ 7 नेत्यांसह नेतृत्वानं संबंधित मंत्र्यांच्या पुनरागमनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्या माजी मंत्र्यानं दिल्लीत जाऊन भाजप श्रेष्ठींची जाऊन भेट घेतली. रविवारी रात्री दिल्लीत ही भेट झाल्याची माहिती सोशल मीडियात या बैठकीचे फोटो झळकल्यानं समोर आलं होतं.

Sunetra Pawar
Kolkata Indigo Flight: काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! कोलकात्यात 4 खासदार अन् 67 प्रवासी असलेल्या विमानाचं अचानक इंजिन बंद पडलं

सुनेत्रा पवार यांनीही यापूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर मुंबईत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी याबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, धनंजय मुंडे यांची भेट झाली होती. आता सोमवारी(ता.2) पुन्हा सायंकाळी कोअर कमिटीची बैठक देवगिरी निवासस्थानी झाली आहे.तसेच उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

तसेच मंगळवारी सायंकाळी सात वाजता होत असलेली बैठक ही सध्या पक्षात सुरू असलेल्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा संभ्रम राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये निर्माण होऊ नये या उद्देशानं होत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या सर्व घडामोडींदरम्यान, पक्षाच्या आमदारांचंही कल जाणून घेण्याचा पक्षनेतृत्व प्रयत्न करू शकते. अर्थात ज्या माजी मंत्र्याचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार आहे, त्याकडेच सुनेत्रा पवारांकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Sunetra Pawar
BJP Shiv Sena alliance : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजप, शिवसेनेतील मतभेदाबाबत मोठे विधान; म्हणाले,'महायुती कधीच......'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.