ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी अचानक राजीनामा दिला असून, काही तासांतच उपाध्यक्ष विलास सोनावळे यांनीही पदाचा राजीनामा दिला.
या दोघांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Thane News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात एकाच आठवड्यात दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात एकीकडे स्थानिकच्या निवडणुकींसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी अचानक राजीनामा दिला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा थांबत नाही तोच जिल्हा उपाध्यक्ष विलास सोनावळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सलग दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. तसेच या राजीनाम्यांच्या मालिकेमुळे पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.
दरम्यान बहुजन समाजाला पक्षात डावलले जात असल्याचा थेट आरोप कर सोनावळे यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे कळते. यावेळी सोनावळे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, राष्ट्रवादीत बहुजन घटकांना सातत्याने डावलले जात आहे. त्यातच राजकारणामुळे व्यावसायिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सोनावळे यांनी पुढे असाही दावा केला, की त्यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही लवकरच राजीनामा देतील. सोनावळे हे गेली 15 ते 20 वर्षे सक्रिय राजकारणात असून, रायते ग्रामपंचायतीत त्यांनी स्वबळावर पक्षाचे सदस्य निवडून आणले होते. त्यांनी रायते सेवा सहकारी सोसायटीत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
दरम्यान आता आधी भरत गोंधळे आणि आता विलास सोनावळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबर धक्का बसल्याचे आता मानले जात आहे.
1. भरत गोंधळे कोण आहेत?
भरत गोंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते.
2. त्यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला?
अधिकृत कारण स्पष्ट झालेले नसले तरी पक्षांतर्गत मतभेद आणि निवडणुकीपूर्व हालचालींमुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
3. विलास सोनावळे कोण आहेत?
विलास सोनावळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष होते.
4. या राजीनाम्यांमुळे पक्षावर काय परिणाम होईल?
संघटनात्मक पातळीवर अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि निवडणुकीतील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
5. राष्ट्रवादी नेतृत्वाची या प्रकरणावर प्रतिक्रिया काय आहे?
अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही, मात्र नेते या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.