Sharad Pawar Maharashtra Tour : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातील दौरे पावसामुळे स्थगित झाले आहेत. मात्र येवला येथील उद्याची सभा निश्चित आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली असून जोरदार तयारी सुरु आहे. पाऊस आल्यास नागरिकांसाठी मंडप उभारला जाईल. या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (NCP leader Sharad Pawar will adress public rally tommarrow in Yeola)
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेसाठी येवल्यात (Yeola) तयारी करीत असलेल्या नेते, कार्यकर्ते, समर्थकांत उत्साह आहे. त्यासाठी येवला मतदारसंघात ठिकठिकाणी फ्लेक्स लावले आहे. गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. नाशिक शहरात देखील बैठका होत आहेत.
महाराष्ट्रात दोन दिवस मोठा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सर्व दौरे रद्द झाले आहेत. मात्र उद्याचा नाशिकचा दौरा होणार आहे. यामध्ये अजित पवार गटात गेलेले छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात त्यांची सभा होत आहे.
श्री. पवार उद्या सकाळी आठला मुंबईहून नाशिकला येतील. त्यांचे हॉटेल एमराल्ड पार्क येथे आगमण होईल. त्यानंतर ते नाशिकला पदाधिकारी तसेच नागरिकांच्या भेटी घेतील. त्यानंतर ते येवल्याला रवाना होतील. दुपारी चारला येवला बाजार समितीच्या मैदानावर त्यांची सभा होईल. सभे्यानंतर ते येवल्याहून नाशिकला येतील नाशिकला मुक्काम करून ते रविवारी सकाळी मुंबईला रवाना होतील, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा आमदार आहे. त्यात छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उर्वरीत नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्या पत्रावर सही केली आहे. मात्र अद्याप भूमिका जाहीर केली नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या सभेसाठी विविध पदाधिकारी सक्रीय आहेत. विविध गावांत तसेच शहरात बैठका घेण्यात येत आहेत. उद्या शरद पवार यांचे शहरात उत्साहात स्वागत होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.