Umesh Patil Sarkarnama
महाराष्ट्र

NCP News : कट्टर विरोधक राजन पाटलांना महामंडळाची 'लॉटरी'; नाराज उमेश पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Political News : माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाराज असलेले उमेश पाटील राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले असल्याची चर्चा रंगली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु आहे. या वादाचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर होत आहे. सातत्त्याने माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात या ना त्या कारणाने वाद सुरु असतो. त्यामुळे त्याचा फायदा विरोधकाना होतो.

आठवडाभरापूर्वी मोहोळ येथे झालेल्या कार्यक्रमावेळी मोहोळ बंद ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश (NCP) प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे उमेश पाटील काहीसे नाराज झाले होते. त्यानंतर शुक्रवारी माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाराज असलेले उमेश पाटील राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले असल्याची चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे राजन पाटलांचे विरोधक आणि अजित पवारांचे समर्थक उमेश पाटील चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आता थेट मी राजीनामा लिहून ठेवला असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सोबत राहिलेले उमेश पाटील आता अजित पवार यांची साथ सोडतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मोहोळ तालुक्यातील या दोन पाटलांमधील वाद चिघळला आहे. माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी इशारा दिला आहे. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतय याचे वाईट वाटतं. ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेले आहे, अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली.

अजित दादांनी मला बैलगाडी खालचा कुत्रा म्हणून संबोधलं याचं वाईट वाटलं नाही. मात्र जरं पक्षाला माझा त्रास होतं असेल तर मी माझा राजीनामा तयार ठेवला आहे. मी राजीनामा द्यायला गेलो होतो मात्र पक्षातील वरिष्ठ युवा नेत्याने मला थांबायला सांगितले आहे. त्यामुळे मी हे राजीनामा पत्र परत घेऊन आलो. मी आता मुख्य प्रवक्ता म्हणून भूमिका मांडणे थांबवलं असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

यापुढील काळात 4 -5 दिवस वाट पाहून पुढचा निर्णय घेणार आहे. राजन पाटील जिथं असतात तोच आमदार निवडून येतो असे पक्षाचा समज झाला असेल. पण आता काळ बदललंय, लोकांची भूमिका बदलली आहे. हे पक्षापर्यंत कसं पोहोचत नाहीये हे मलाही न समजणारे कोडे आहे. एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी सर्वासामान्य लोकांवर अन्याय होत असल्याची टीका यावेळी उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT