Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने आता सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा आली आहे. त्यासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार ठरवण्यासाठी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित कोअर कमिटीचाही बैठक होणार असून त्यामध्ये उमेदवार फायनल होणार सालीचे समजते. एका जागेसाठी 'ही' चार नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे कोणाची उमेदवारी फायनल होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता जॉर्डर हालचाली होत आहेत. सोमवारी सायंकाळी कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. या चार जणांपैकी एकाचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अमोल मिटकरी हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे या जागेवर त्यांनी ही दावा केलेला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता कॊणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.