NCP Merger Rohit Pawar to Reveal on Feb 12 Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger: राष्ट्रवादीसाठी 12 तारीख महत्वाची! विलिनीकरणाबाबत दादांची इच्छा राजकीय की भावनिक होती? रोहित पवार सगळं सांगणार

NCP Merger Rohit Pawar to Reveal on Feb 12: विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं, दादांच्या मनात काय इच्छा होती. त्याला राजकीय अंग आहे की भावनिक अंग आहे, हे मी 12 तारखेला सांगेल, असे रोहित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

Mangesh Mahale

Baramati News Feb 12: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. याबाबत दोन्ही पक्षातील काही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पण विलिनीकरणाबाबत अजितदादांच्या मनात काय होते, हे विलिनीकरणाचा निर्णय राजकीय की भावनिक पातळीवर होणार होता, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे येत्या 12 तारखेला सांगणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज काटेवाडीमध्ये माध्यमांना दिली.

विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं, दादांच्या मनात काय इच्छा होती. त्याला राजकीय अंग आहे की भावनिक अंग आहे, हे मी 12 तारखेला सांगेल, असे रोहित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

आम्ही भावनिक आहोत...

अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षावर मला बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल मात्र भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो.. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्यावर मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही आम्ही भावनिक आहोत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सगळ्यांच्या मनात शंका...

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या विमानात बाँम्बसारखी काही वस्तू असू शकेल, अशा संशय सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले की सगळ्यांच्या मनात शंका आहे.आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. का घडलं कसं घडलं असावं याबाबत 10 तारखेला मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे.

परिवार अजूनही एकत्र...

दादांची मनापासूनची इच्छा होती, परिवार म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याच पद्धतीने आज सर्व एकत्र आले. दादांकडूनही प्रयत्न केले गेले होते आम्ही त्याच पद्धतीने प्रयत्न करत राहू. परिवार अजूनही एकत्र आहे. दादांचा स्वप्न आहे परिवार म्हणून आपण एकत्र राहू आणि तसंच काही होईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सुनेत्रा काकीमध्ये मी अजितकाकांना पाहतो...

सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? यावर ते म्हणाले, "सुनेत्रा काकीमध्ये मी अजितकाकांना पाहतो. दादांची पोझिशन जी होती तीच पोझिशन सुनेत्रा पवारांना मिळावी हीच आमची इच्छा आहे,"

नऊ तारखे नंतर राजकीय चर्चा

सुनेत्राकाकी पार्थ-जय पवार आम्ही या दुःखातून सावरलो नाही, राजकीय विचार मनामध्ये येत नाहीत. घटना दुर्दैवी आहे. मला राजकीय विचार करण्याची क्षमता येईल त्याबाबत आम्ही स्पष्ट सांगू, आत्तापर्यंत पवार कुटुंबियात कुठली राजकीय चर्चा झालेली नाही. नऊ तारखे नंतर राजकीय चर्चा कुटुंबात होईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT