

Ajit Pawar Death CID investigation: महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला, यावर काही नेते आपल्या अकलेचे तारे तोडत असतानाच केंद्रीय गुन्हे शाखेनं (सीआयडी)ने या प्रकरणाच्या तपासाला वेग आणला आहे.
CIDने काल (शुक्रवारी) अजित पवारांचे खासगी सचिव (PA) अविनाश सोलवट यांच्याकडून मंत्रालयात सुमारे ४ तास सखोल माहिती घेतली. सीआयडीच्या तपासाचा सगळा भर हा अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या रात्री (27जानेवारी) काय झाले? यावर होता.
27 तारखेला मंत्रालयात बैठक संपल्यानंतर अजितदादांंचे फारसे नियोजित कार्यक्रम नव्हते, तरीही ते मुंबईत होते, दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामतीत त्यांच्या चार सभा होत्या. 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन नक्की कुणी केले? त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या? याबाबत सोलवड यांच्याकडून सीआयडीने माहिती घेतली.
प्रवासाच्या आदल्या रात्री (27 जानेवारी) अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती?
दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का?
बारामती दौऱ्याची आखणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती?
प्रवासाचा मार्ग आणि वेळ कुणी निश्चित केली?
या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली ?
विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का? याचाही तपास होत आहे.
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता. यात अजितदादांसह विमानातील इतर 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली आहे.
आता अविनाश सोलवट यांनी दिलेल्या माहितीतून सीआयडीच्या तपासाची दिशा कुठे जाते, हे लवकरच समजेल. अजित पवार याचा दशक्रिया विधी काल (शुक्रवारी) बारामतीत झाला. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.