Sunetra Pawar, Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, सुनेत्रा पवार भूमिका मांडणार?

Sunetra Pawar press conference : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे याबाबत ते काय भूमिका मांडणार याची चर्चा सुरू आहे.

Roshan More

NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली आहे. या विषयीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी काल रात्री शरद पवारांची भेट घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्या नेमकी कोणती भूमिका मांडणार, या बाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांची विलीनीकरणाबाबत काय भूमिका आहे, हे आज स्पष्ट होईल, अशी देखील देखील वर्तवली जात आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत कोणती चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी घुमजाव करत चर्चा झाली होती. आणि अजितदादा असते तर फेब्रुवारीमध्ये विलिनीकरण झाले असते, असे म्हटले आहे.

भाजपच्या भूमिकडे लक्ष

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असल्याने भाजपच्या भूमिकेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेत सहभागी असल्याने भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य नाही, असे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT