Idris Naikwadi sarkarnama
महाराष्ट्र

NCP MLA Resignation : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना? स्वतः सांगितले...

NCP leader reaction on resignation issue : मंत्र्याच्या ओसएडीने इद्रीस नायकवडी यांची भेट घेत त्यांनी राजीनामा देण्याचा निरोप दिल्याची चर्चा आहे. त्यावर नायकवडी यांनी आपली बाजू मांडली आहे.

Rahul Gadkar

Idris Naikwadi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल कोट्यातली आमदार इद्रीस नायकवडी यांना राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली आहे, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनी प्रसिद्ध केले. 15 दिवासंपूर्वी मंत्र्याच्या ओएसडीने नायकवडी यांची भेट घेत त्यांना राजीनामा देण्याविषयीचा निरोप दिला होता. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्वावाला त्यांचा राजीनामा हवा असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, या वृत्तावर इद्रीस नायकवडी यांनी आपले म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणाले, पक्षातील काही जणांकडून अशा वावड्या उठवल्या जात आहेत.पक्षांतर्गत काही लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसाव्यात त्यामुळे ते अपेक्षा करत असतील. मात्र, माझ्याकडे पक्षाकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली नाही.

ओएसडी भेटीबाबत बोलातना ते म्हणाले, मी आमदार आहे. माझ्याकडे अनेक ओएसडी येत असतात. परस्पर चर्चा घडवत असतील माझ्यापर्यंत निरोप आला नाही.

इद्रिस नायकवडी यांची नेमणूक राष्ट्रवादीच्या कोट्यातून 2024 मध्ये झाली होती. त्यांच्या कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर पद भूषवले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

15 दिवसांपूर्वी आमदार नायकवडी यांना मंत्र्यांच्या ओएससीडीकडून राजीनामा देण्याचे निरोप पाठवण्यात आला होता. शिवाय स्वतः ओएसडी राजीनाम्याचा नमुना घेऊन आमदार नायकवडी यांना भेटले होते. मात्र आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका नायकवडी यांनी घेतल्याचे सांगितले जाते होते. मात्र, नायकवडी यांनी त्याला ठाम नकार दिला. मात्र, आता त्यांनी स्वतः अशी कुठली मागणी आपल्याकडे केली गेली नसल्याचे म्हटले.

दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून नायकवडी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार केले होते. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे. या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता देखीव वर्तवली जात आहे,

...राज्यपाल राजीनामा घेणार?

आमदार ईद्रीस नायकवडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर देखील होते. त्यावेळी देखील त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. आता देखील आपण कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर आमदार नायकवडी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यास स्वतः राज्यपाल त्यांचा राजीनामा घेण्याची तरतूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT