Maratha Reservation News : "मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील सर्व गावातून नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
'आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय... पण ही आग विझवण्याचे सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगडमध्ये भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात...'असे ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात ? असा सवाल ही रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे.
एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत, पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का ? असा सवाल करीत रोहित पवार यांनी गृहमंत्री फडणवीस यांना धारेवर धरले आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रचारात गुंतलेल्या गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका करीत खासदार सुप्रिया सुळेंनी करेक्ट टायमिंग साधला होता. त्यांनी लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे. या काळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे, परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापूर्वीदेखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.