Sunil tatkre, sunetra pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : अनिकेत तटकरेंना आमदार करण्यासाठी खलबतं : सुनील तटकरे अन् सुनेत्रा पवारांपुढे दोन मार्ग; कोणता निवडणार?

Maharashtra MLC election News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन् उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. महायुतीच्या वाट्याला सर्वाधिक जागा येत आहेत. त्यामुळे सध्या या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 एप्रिलला शेवटचा दिवस असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक जागा आली आहे. मात्र, दुसरीकडे या जागेसाठी सात जण इच्छुक असल्याचे समजते. त्यातच या एकमेव जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन् उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरेंना संधी देण्यात यावी यासाठी आग्रही आहेत. त्याबाबत तटकरे यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अनिकेत तटकरेला आमदार करण्यासाठी दोन नेत्यांमध्ये खलबतं झाली असून आता याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिकेत तटकरे हे सुनील तटकरे (Sunil tatkre) यांचे ज्येष्ठ पुत्र आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे बंधू आहेत. त्यांनी 2018 ते 2024 या काळात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा कार्यकाळ 31 मे 2024 रोजी संपला असून, सध्या ही जागा रिक्त आहे. त्यामुळे या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली जाऊ शकते तर दुसरीकडे आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देता येऊ शकते. सध्या सुनील तटकरे अन् सुनेत्रा पवारांपुढे दोन मार्ग आहेत. त्यापैकी कोणता मार्ग निवडणार याची उत्सुकता लागली आहे.

'घराणेशाही'च्या आरोपांना तोंड द्यावे लागणार

तटकरे यांच्या एकाच कुटुंबात खासदार सुनील तटकरे, आमदार व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पदे आहेत. तर पुन्हा विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची वर्णी लागल्यास तटकरे यांच्या एकाच घरात तीन पदे दिल्यास 'घराणेशाही'च्या आरोपांना तोंड द्यावे लागेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे याबाबत सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून या जागेसाठी सुनील तटकरे यांच्याकडून पुत्र अनिकेत तटकरे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. त्याशिवाय निवृत्त होत असेलल्या अमोल मिटकरी पुन्हा संधी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT