सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे मंगळवारी(ता.10) उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, काही लोक सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा विरोध करत असले, तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे. पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देणे आवश्यक आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे, तसेच पक्षाच्या आंतरिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो ,असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपनं चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करत सत्तास्थापन केली. तसेच एका मतानं महापौर पदाची निवडणूकही जिंकली. पण संधी असूनही प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादात काँग्रेस सत्तेपासून दूरच राहिली. या निवडणुकीत संगीता खांडेकर यांच्याकडे महापौरपद तर उपमहापौरपद शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रशांत दानव यांच्याकडे आले आहेत. पण भाजप ठाकरेंच्या शिवसेनेत सत्तास्थापन करताच काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. हायकमांडकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे.
राष्ट्रवातीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ता चव्हाण, रवींद्र पाटील, सुभाष गायकवाड, महेश जाधव, इ. पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (श.प) जेष्टनेते शरदचंद्र पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांचा खोकला देखील कमी झाला असल्याची माहिती....
सोमवारी (ता.10) रोजी शरद पवारांना रूग्नालयात दाखल केले होते.
काल दुपारी शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेय...
खोकला आणि कफ झाल्याची माहीती मिळाली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती आहे.
विमानाचे पायलट का बदलले गेले, मला शंका आहे हा घातपात असू शकतो..
पायलट सुमित कपूर यापुर्वी दोनदा मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत सापडला आहे..
दारू प्यायल्यामुळे कपूर 3 वर्ष निलंबित राहीलेला आहे..
कंपनीचा डायरेक्टरच दारी पीत असेल तर इतरांच काय..
विमानाचा ट्रान्स्पोन्डर बंद केला होता का ? विमानातील PPT स्सिस्टीम बंद केली होती.
29 ची परवानगी असताना 11 नंबरचा च रनवे चा आग्रह का होता..?
5 किमी. विजिबीलिटी नसताना देखील लॅन्ड का केले ?
रोहीत पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत
पुणे महानगरपालिकेतील भाजपाचे नवनियुक्त नगरसेवक राघवेंद्र मानकर जे प्रभाग 25 मधून निवडून आले आहेत. त्यांचा एक स्तुत्य आदर्श निर्णय समोर आला आहे. त्यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे महापालिकेचे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.
मानकर यांनी ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे. शहरातील गरजू रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी ही रक्कम खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघात नेमका कसा झाला, सुरक्षेतील त्रुटी होत्या का, याबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकवण्यात यश मिळवले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपने केवळ एका मताने विजय प्राप्त केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर, तर ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संग्राम थोपटे ह्यांची पत्नी स्वरूपा थोपटे विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत संग्राम थोपटे यांचा भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नांदेडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या कविता मुळे यांची, तर उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड झाली आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मुळे आणि रावत या दोघांनाही प्रत्येकी ५० मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक मात्र तटस्थ राहिले होते.
चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला आहे, एवढंच मला माहिती झालं आहे. तिथं ठिकाणी काय आघाडी केली आहे, ती कोणत्या पद्धतीने केलेली आहे. याची माहिती मी घेऊन तुम्हाला देईन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप युतीवर दिली.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर मी बोलणं योग्य नाही. विलिनीकरणाचा जेव्हा ठरेल, तेव्ही मी बोलेन, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मांडलं आहे की, पराभूत उमेदवारांना आता स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाणार नाही. ज्यांना तिकिट मिळालं नाही, अशा लोकांना संधी दिली जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वासचा ठराव मांडण्यात आलेला आहे. या ठरावावर ११४ खासदारांच्या सह्या आहेत. संसदीय कामकाजानुसार ९४ सी अंतर्गत हा अविश्वासाचा ठराव मांडण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.... आज संध्याकाळी त्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळतेय... या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येतेय...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या. त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत. त्या मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या पदभार स्वीकारतील त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मुलगा पार्थ पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते. बाप्पाच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांनी चैत्यभूमीवर जाऊन ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.थोड्याच वेळात त्या पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मदतीने चंद्रपुरात भाजपचा महापौर होईल असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र चंद्रपुरात भाजपला मदत करायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयात जाऊन त्या उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारतील. त्याआधी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन त्या ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारणार आहेत. त्यानंतर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावणार असून त्यानंतर त्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. तर उद्या त्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
'बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे', असं आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यापूर्वी त्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शनसाठी आल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेत भाजपच्या मंजुषा नागपुरे या महापौरपदी तर रिपाइंचे परशुराम वाडेकर उपमहापौरपदी निवडून आले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यानंतर आता भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच चंद्रकांत पाटील यांनी "भाजपचे स्पष्ट धोरण आहे की, महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे. सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. तर नगरपालिका, महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकालातही भाजपच नंबर वन पक्ष ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.