Sharad Pawar, Ajit Pawar, Yugendra Pawar, rohit pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : पुढचा पाडवा एकत्र? शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर युगेंद्र अन् रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, "आमचं कुटुंब कधीच..."

Sharad Pawar Birthday : राज्याच्या राजकारणात गुरूवारी एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीपासून एकमेकांशी कधीही समोरासमोर भाष्य न करणाऱ्या शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याची दिल्लीत भेट झाली.

Jagdish Patil

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी अजित पवारांसह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुलगा जय पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते.

तर अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि अजित पवारांविरोधात बारामती विधानसभा लढवणारे युगेंद्र पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार म्हणाले, "आमच्या कुटुंबाने नेहमीच कौटुंबिक संबंध आणि राजकारण हे वेगळं ठेवलं आहे. आज साहेबांचा 85 वा वाढदिवस असल्यामुळे त्यांना जाऊन भेटलं पाहिजे या भावनेने अजित पवार आले असतील. शिवाय मागील निवडणुकींमध्ये आम्ही आमची पातळी सोडली नव्हती आमचं कुटुंब कधीही तसं वागत नाही.

शेवटी राजकारण, विचार हे एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असलं पाहिजे. आता विचार वेगळे झाले असले तरीही कुटुंब एकत्र आलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं ते म्हणाले. तसंच आजची भेट ही पूर्णपणे कौटुंबिक आहे. बाकी काहीही नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, पूर्वीपासूनच आमच्या कुटुंबातील सदस्त प्रत्येक कार्यक्रमाला समारंभाला वाढदिवसाला एकत्रित येत होतं. आताही एकत्रित येत आहेत, असं सांगितलं. यावर पत्रकारांनी यावर्षी तुम्ही दिवाळी पाडवा वेगवेगळा साजरा केला असं विचारताच ते म्हणाले, "निवडणुका आणि दिवाळी पाडवा एकत्र आल्यामुळे पाडवा वेगळा घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला असेल."

यावर पुढील पाडवा एकत्र करणार का? असं विचारताच, "आता ते पुढच्या वर्षी बघू" अशी सूचक प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "अजितदादा आणि त्यांच्यासोबत अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला आले ही चांगली गोष्ट आहे.

शेवटी हीच आपली संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे. ती जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. मोठे नेते अशा प्रकारे संस्कृती जपत असतील तर चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या राजकारणामध्ये नवीन आलेल्यांना आमदारांना जेव्हा आधीची पिढी संस्कृती जपते हे बघताना नक्कीच आवडतं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT