Nana Patole-Uddhav Thackeray
Nana Patole-Uddhav ThackeraySarkarnama

Mahavikas Aghadi : विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने घेरलं; 'त्या' महत्त्वाच्या पदावर केला दावा

Mahavikas Aghadi Politics : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकालाचं चित्र स्पष्ट होईपर्यंत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला होता. मात्र, या निवडणुकीत 'मविआ'चा दारूण पराभव झाला अन् मुख्यमंत्रि‍पदाचे स्वप्न भंगले.
Published on

Nagpur News, 12 Dec : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकालाचं चित्र स्पष्ट होईपर्यंत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला होता.

मात्र, निवडणुकीच्या निकालात 'मविआ'चा दारूण पराभव झाल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रि‍पदाचे स्वप्न भंगले. मुख्यमंत्रीपद लांबच पण आता आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ देखील नाहीये.

अशातच आता काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जात आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Nana Patole-Uddhav Thackeray
Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजितदादांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर PM मोदींकडून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना!

याबाबतच्या हालचाली देखील काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून याबाबतचा तोंडी प्रस्ताव देखील ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) काँग्रेसकडून दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मागील सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे होती.

विधानपरिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे प्रत्येकी 7 सदस्य आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 सदस्य आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या सदस्यांचं विधानपरिषदेतील संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.

Nana Patole-Uddhav Thackeray
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! 6 आमदारांमागे एक मंत्रिपद तर अजितदादांचा प्लॅन 'बी' तयार

विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक अधिकार मिळवून देणारे पद असल्यामुळे हे पद ज्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाला बळ मिळतं. त्यामुळेच काँग्रेस दोन्ही सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यास तयार नाही. तर याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com