Sharad-Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिबिराला 3 आमदार अन् 2 खासदार गैरहजर, नेमके कारण काय?

Sharad Pawar camp absent MLAs MPs News : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविवारी एकदिवसीय शिबिर पार पडले. या शिबिराला पक्षातील 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे चर्चेला उधाण आले असले तरी त्यांच्या गैरहजर राहण्याचे नेमके कारण समोर आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविवारी एकदिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसरीकडे या शिबिराला पक्षातील 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे चर्चेला उधाण आले असले तरी त्यांच्या गैरहजर राहण्याचे नेमके कारण समोर आले आहे. त्यामुळे दांडी मारणारे नेमके नेते कोण आहेत याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते. सुरुवातीच्या वेळात ते अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले. शिबिरात उशिरा येण्यासाठी रेल्वे जबाबदार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबद्दल सकाळच्या सत्रात सुरु असेलल्या चर्चाना पूर्णविराम भेटला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाचे विधानसभेत 10 आमदार असून त्यापैकी फक्त ७ आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली, तर तीन आमदार अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील चार पैकी तीन आमदार या शिबिराला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. सोलापूरमधील आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण आबा पाटील, आमदार उत्तम जानकर यांनी शिबिराला अनुपस्थित होते. मात्र, नारायण आबा पाटील, अभिजीत पाटील हे उशिराने शिबिरासाठी दाखल झाले.

शिबिराला दोन खासदारांची दांडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी तब्येतीच्या कारणास्तव ते शिबिराला आले नाहीत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमोल कोल्हे यांनी याबाबत पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वात कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ते या अधिवेशनाला गैरहजर आहेत.

तीन आमदार गैरहजर :

आमदार रोहित पाटील यांच्या घरात दुःखद घटना घडल्यामुळे ते या शिबिराला उपस्थित राहिले नाहीत. तर आमदार राजू खरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असल्याने ते अनुपस्थित आहेत. तर आमदार उत्तम जानकर यांच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट झाले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT