Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

Sunil Prabhu Reply To Raj Thackeray : आमच्यावर सेटलमेंटचा आरोप करणे चुकीचे आहे. मुंबई ही अदानींच्या घशात घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत.
Raj Thackeray-Sunil Prabhu
Raj Thackeray-Sunil PrabhuSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेने काढलेला मोर्चा हा सेटलमेंट वैगेरे काही नाही. आम्हाला मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही अदानींच्या घशात घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत. त्यामुळे सेटलमेंटची भाषा चुकीची आहे. महाराष्ट्राची जनता एवढी सुज्ञ आहे की, त्यांना चांगलं कळतं की सेटलमेंट कोण कोणाशी करतं, असं सांगून शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. (Shiv Sena MLA Sunil Prabhu's reply to Raj Thackeray's allegation)

शिवसेनेचा मोर्चा हा सेटलमेंटल पॉवर वाढविण्यासाठी काढला होता, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्याला आमदार सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, आमच्यावर सेटलमेंटचा आरोप करणे चुकीचे आहे. मुंबई ही अदानींच्या घशात घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्रीपद सोडले, त्याच दिवशी त्यांनी धारावी पुनर्विकासासाठी अदानींना देण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे, हे जगजाहीर आहे. या सर्व पापाचा वाटेकरी हा भारतीय जनता पक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray-Sunil Prabhu
Maharashtra Politics : राणेंनी झळकावलेल्या फोटोला महाविकास आघाडीचे विधान परिषदेतून उत्तर...

धारावीच्या पुनर्विकासाचा अध्यादेश आल्यानंतर कळू शकतं की धारावीत काय होतंय. त्या अध्यादेशात संपूर्ण अधिकार हे अदानीला आणि अव्वाच्या सव्वा टीडीआर हा अदानीला दिला असेल. तसेच, मुंबईतील प्रत्येक नागरिकाला पहिला टीडीआर घेण्यासाठी अदानीकडे जावे लागत असेल तर हा मुंबईला वेठीला धरण्याचा प्रकार होता. त्यामुळे शिवसेनेने आता हा मोर्चा काढला आहे, असा उत्तर सुनील प्रभू यांनी राज ठाकरेंना दिले.

शिवसेनेचा विरोध अदानीला आणि विकासाला नाही. सरकारने घेतलेल्या धोरणाला आहे. धारावीच्या पुनर्विकासाबाबत सरकारने तयार केलेले धोरण चुकीचे आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या घशात धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प घालायचा. धारावीतील मूळ नागरिकांना त्या ठिकाणाहून दूर न्यायचं. त्यांना पाचशे फुटाचं घर द्यायचं नाही. सरकारने हे करायचे नाही आणि एकाच माणसाला गडगंज श्रीमंत करण्याच्या दृष्टीने हा सर्व प्रकार चाललेला आहे, असा आरोपही सुनील प्रभू यांनी केला.

Raj Thackeray-Sunil Prabhu
Winter Session 2023 : एवढे दिवस काय झोपला होता काय? संत्र्यावरून सरकारवर भडकले देशमुख

ते म्हणाल की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कुणाची भाषा करत आहेत, हे त्यांना माहिती. तसेच, सेटलमेंटची भाषा कोण करतंय, हे जनता ठरवेल.

Raj Thackeray-Sunil Prabhu
Winter Session 2023 : नागपूर स्फोटावरून विरोधकांचा सभात्याग अन्‌ अजितदादांची नाराजी...; ‘असं वागणं बरं नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com