Sharad Pawar, Tutari Sarkarnama
महाराष्ट्र

Ncp Sharad Pawar News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित; 'या' उमेदवारांची नावे फायनल?

Sachin Waghmare

Ncp News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राज्यातील काही जागांवर निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित झाल्या असून या उमेदवारांची नावे फायनल असल्याचे समजते.

महविकास आघाडीतील जागावाटप अजून पूर्ण झालेले नाही. त्यापूर्वीच काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काही जागेवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित झाल्या आहेत. त्यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या नऊ जागांचा समावेश आहे. (Ncp Sharad Pawar News)

जागा आणि संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे :

बारामती-सुप्रिया सुळे, माढा-महादेव जानकर(रासप), सातारा-बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरुर-अमोल कोल्हे, नगर दक्षिण-निलेश लंके, बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्धा-अमर काळे यांची नावे जवळपास फायनल झाली आहेत.

महाविकास आघाडीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील सांगली, रामटेक या काही जागावरून काँग्रेस (Congress) व शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena) गटात मतभेद असल्याचे पुढे आले आहे. या जागेवरील तिढा सोडवून येत्या काळात तोडगा काढून जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT