Mumbai News : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबाबत गेलेल्या सहा बंडखोर खासदारांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांनीही सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी या आठ खासदारांच्या मतदारसंघातील समस्या, पाऊस व विकास कामाबाबत चर्चा झाली. त्यासोबतच यावेळी शेतकरी कर्जमाफीतील अनियमतेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले आहे. डिलिमिटेशन विधयेक लोकसभेत मांडण्यात आलेले नाही. त्याबाबत आताच चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे खासदार भेटीचा संबंध डीलिमिटेशनशी जोडू नका, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याशिवाय या भेटीत खासदार कोल्हे यांनी पुणे-नाशिक रेल्वेच्या मुद्द्यावर पीएम मोदी यांचे लक्ष वेधले. त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी, नमामि चंद्रभागाबाबत यावेळी चर्चा झाली. खासदार निलेश लंके यांनी प्रत्येक जिल्हयात कॅन्सर रुग्णालय व्हावे, अशी मागणी केली.
खोडद येथील खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे कारण देत केंद्र सरकारने मूळ मार्ग रद्द करून 'नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे' असा वळणदार पर्याय समोर आणल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. नाशिक-पुणे रेल्वे ही नाशिक- संगमनेर- पुणे मार्गेच व्हावी यासाठी यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी आक्रमक आहेत. नुकतेच या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.