NCP Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Sharad Pawar internal dispute : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा अंतर्गत वाद? महिला अध्यक्षपदावरून शशिकांत शिंदेंना थेट टार्गेट

NCP faces internal friction over Mumbai women president appointment; complaint against Shashikant Shinde reaches Sharad Pawar : मुंबई विभागीय महिला अध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; शशिकांत शिंदेंच्या कार्यपद्धतीवर आरोप करत शरद पवारांकडे तक्रारपत्र

Pradeep Pendhare

Mumbai NCP : राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोर वाढवला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट मुंबईतून कामाकाजाला सुरूवात केली आहे. महिला संघटन मजबूत करण्यावर भर असला, तरी मुंबई विभागीय महिला अध्यक्षपदावरून शरद पवार राष्ट्रवादीत खदखद सुरू आहे.

यातून वाद वाढला असून, थेट शशिकांत शिंदेंना टार्गेट करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पत्र लिहून, शशिकांत शिंदे यांची तक्रार करण्यात आली आहे. या पत्रावर शरद पवार काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाच्या मुंबई विभागीय महिला अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून, यासंदर्भात शरद पवार यांना पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील एका कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याकडून होत असलेल्या नवीन नियुक्तीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला असून, पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

सध्याच्या मुंबई महिला अध्यक्ष प्रिया बांदिवडेकर यांना हटवून त्यांच्या जागी मुलुंड तालुकाध्यक्ष संगीता वाजे यांची नियुक्ती करण्यासाठी शशिकांत शिंदे आग्रही असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. महिला पदाधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना आणि कोणाचेही मत न घेता शशिकांत शिंदे हा बदल करत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

आरोप करणाऱ्या पत्रांवर, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, मुंबईत आज पक्षाची बैठक आहे. त्या वेळी याबाबत माहिती घेणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, एवढीच प्रतिक्रिया दिली. परंतु शरद पवार यांच्याकडे गेलेल्या तक्रार पत्रावर शशिकांत शिंदे यांनी भाष्य टाळले. शरद पवार याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT