Shivsena UBT News : अमित शाह मुंबईत! शिवसेना ठाकरेंचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत? संतोष शिंदेंचा VIDEO व्हायरल

Amit Shah Mumbai visit : शिवसेना UBTचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी पोलिसांकडून घराबाहेर पडण्यास आणि वाहनातून प्रवास करण्यास रोखल्याचा आरोप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर नाही.
Santosh Shinde Police Video
Santosh Shinde Police VideoSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Thackeray faction : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई दक्षिण शाखा क्रमांक 12चे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, आपल्याला घराबाहेर पडण्यापासून तसेच वाहनातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा केला आहे.

संतोष शिंदे यांच्या या व्हिडिओमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षातील (Shivsena UBT) राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवा वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओमध्ये संतोष शिंदे आपल्या वाहनातून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यावेळी साध्या वेशातील काही पोलिस कर्मचारी त्यांना अडवत असल्याचे चित्रफितीत दिसते. शिंदे यांनी वाहनात बसण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

‘मी माझ्या कामानिमित्ताने चाललो आहे. त्यांचा कार्यक्रम कुठे आहे, हे मला माहिती नाही,’ असे संतोष शिंदे यावेळी सांगताना दिसतात. त्यावर संबंधित पोलिस (Police) कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकारी येत असल्याचे सांगितले. यावर शिंदे यांनी, ‘मी चाललो आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्या मागून यायला सांगा,’ असे प्रत्युत्तर दिले. यानंतर शिंदे यांनी वाहनात बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावर संतोष शिंदे संतापले. ‘तुम्ही मला वाहनात बसण्यापासून अडवू शकत नाही. मी गाडीत बसणार,’ असे ते पोलिसांना सांगताना दिसत आहेत.

Santosh Shinde Police Video
Amit Shah Iron Man : अमित शाहांना ‘लोहपुरुष’ म्हणताच शिवसेना ठाकरे पक्षाचा पलटवार; अखिल चित्रेंचा ‘मोहपुरुष’ म्हणत घणाघात

शिंदे यांना वाहनात बसण्यापासून रोखण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचारी गाडीच्या दरवाजासमोर उभा राहिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावर संतोष शिंदे यांनी पोलिसांना जाब विचारला. ‘तुमची ही दादागिरी कशी काय?’ असा सवाल करत त्यांनी पोलिसांशी वाद घातला. यावेळी दोघांमध्ये काहीशी धरपकड झाल्याचेही चित्रफितीत दिसते. दरम्यान, शिंदे यांचा एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला बाजूला करत संतोष शिंदे यांच्यासाठी वाहनाचा दरवाजा उघडला.

Santosh Shinde Police Video
Amit Shah Mumbai : ‘सुप्रीम कोर्टातील युक्तिवादामुळे अमित शाह पळत-पळत महाराष्ट्रात’; हर्षवर्धन सपकाळांचा बोचरा टोला

‘गणवेशात या, मग पाहू’

यानंतर संतोष शिंदे यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सुनावले. ‘मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही गणवेशात या, मग पाहू,’ असे ते म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शिंदे वाहनात बसल्यानंतर संबंधित पोलिस कर्मचारी काही वेळ गाडीसमोर उभा राहिल्याचे दिसते. त्याचवेळी आणखी एक पोलिस कर्मचारी शिंदे यांच्याजवळ येऊन, ‘साहेब, ऐका ना,’ अशी विनंती करताना दिसतो. मात्र, शिंदे वाहनातून उतरले नाहीत.

राजकीय वातावरण तापले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अडवण्यात आल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, संतोष शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या आधारे हा दावा समोर आला असून, पोलिसांकडून या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. आगामी काळात मुंबईतील भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता या घटनेमुळे व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com