Shashikant Shinde announces Rohit Pawar’s appointment as General Secretary of the NCP (Sharad Pawar faction), aiming to energize party leadership.  Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar News : पदभार स्वीकारताच शशिकांत शिंदेंचा मोठा धमाका; रोहित पवारांना दिलं महत्वाचं पद

Shashikant Shinde’s Role in Strengthening Party Leadership : शशीकांत शिंदे यांनी बुधवारी रोहित पवार यांना नियुक्तीचे पत्र दिले. शरद पवार यांच्या पक्षात यापुढील काळातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Rajanand More

Rohit Pawar’s New Role : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाचा जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदार शशीकांत शिंदे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच आमदार रोहित पवार यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे.

शशिकांत शिंदे यांनी बुधवारी रोहित पवार यांना नियुक्तीचे पत्र दिले. प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची मोठी जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षामध्ये तरूण नेत्यांना संधी देण्याबाबतच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला बळ देणारी ही नियुक्ती असल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी देताना माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्षाचा मनापासून आभारी आहे. पक्षाच्या सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय-धोरणे, कार्यक्रम आणि महाराष्ट्र धर्म व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न राहील.

त्याचप्रमाणे पक्ष वाढीसाठी पूर्ण समर्पणाने काम करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. हे काम करताना आजपर्यंत जसं सर्वांचं सहकार्य लाभलं तसंच यापुढंही राहील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे शरद पवार यांच्या पक्षात यापुढील काळातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच पक्षसंघटनेतील मोठ्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. तर आता रोहित पवार प्रदेश सरचिटणीस असतील. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्रातही पक्षातील महत्वाच्या पदाची जबाबदारी पवार कुटुंबातील सदस्याकडे आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT