CM in Jail : केजरीवालांनंतर आणखी एक मुख्यमंत्री तुरूंगात जाणार? राहुल गांधी म्हणाले, मोदी-शहाही वाचवू शकणार नाहीत...

Rahul Gandhi’s Explosive Allegation Against Himanta Biswa Sarma : राहुल गांधी हे बुधवारी आसामच्या दौऱ्यावर होते. चायगांव येथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi’s Allegation : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावर असताना ईडीने कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते काही महिने तुरुंगात होते. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागीलवर्षी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तुरूंगात जावे लागले होते. आता काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार प्रकरणात आणखी एक मुख्यमंत्री लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे विधान केले आहे.

राहुल गांधी हे बुधवारी आसामच्या दौऱ्यावर होते. चायगांव येथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे लवकरच जेलमध्ये जातील. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही वाचवू शकणार नाहीत, असे राहुल यांनी म्हटले आहे.

एकीकडे आरएसएसची द्वेष, विभागणी आणि लढविण्याची विचारधारा आणि दुसरीकडे काँग्रेसची द्वेष संपविण्याची विचारधारा आहे. आज आसाममध्ये जे होत आहे, तेच संपूर्ण देशातही सुरू आहे. येथील मुख्यमंत्री स्वत:ला राजा समजत आहेत. पण त्यांच्या आवाजामागे, डोळ्यांत भीती लपली आहे. त्यांच्या मनात भीती आहे. कारण त्यांना माहित आहे की, काँग्रेसचे बब्बर शेर त्यांना जेलमध्ये टाकतील. भ्रष्टाचाराचा हिशोब आसामच्या जनतेला द्यावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Prakash Ambedkar : धाकट्या भावाच्या युतीवर प्रकाश आंबेडकर प्रचंड संतापले; 4 तासांतच एकनाथ शिंदेंच्या मनसुब्यांना दिला धक्का...

मी जे बोलतो, तसे होते, असे सांगत राहुल म्हणाले, मी कोरोना, नोटबंदी, जीएसटीवेळी जे बोललो, त्याचे परिणाम तुम्ही पाहिले. मी आज बोलतोय की, काही कालावधीनंतर मीडियावाले तुमच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाताना दाखवतील. त्यांना नरेंद्र मोदी, अमित शाह हेही वाचवू शकणार नाहीत. हे काम काँग्रेस नव्हे तर राज्यातील युवक, शेतकरी, मजूर करून दाखवतील. हा व्यक्ती भ्रष्ट आहे, हे त्यांना माहिती आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.

Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Donald Trump : गोळी खायलाही तयार होती! ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर आधार देणारी महिला पुन्हा चर्चेत

मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राहुल गांधी यांच्या टीकेला मुख्यमंत्री सरमा यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आसाममध्ये येतात आणि मला जेलमध्ये टाकण्याबाबत बोलतात. पण ते विसरत आहेत की, ते स्वत: जामिनावर बाहेर आहेत, असे सरमा यांनी सोशल मीडियातून म्हणत राहुल यांच्या टीकेची खिल्ली उडवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com