Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : 'इलेक्शन'ची घोषणा, रोहित पवारांची 'मविआ'बाबत सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी जाहीर होताच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची महाविकास आघाडीला समावून घेणारी प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदानाच्या आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शंखनाद, आता एका टप्प्यात कार्यक्रम, तयार है, सज्ज आहे, अशा एक से बढकर एक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली.

केंद्रीय निवडणूक (Election) आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल, तर 23 मतमोजणी होईल. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच, राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

भाजप (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शंखनाद', अशी एका शब्दात प्रतिक्रिया त्यांच्या समाज माध्यमांवर व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'आता एका टप्प्यात कार्यक्रम', अशी प्रतिक्रिया देत महायुती सरकारला डिवचलं.

जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेपाठोपाठ आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील चर्चेत आली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून निवडणुकीला महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा संदेश दिला आहे. 'निष्ठा, अस्मिता आणि स्वाभिमानाच्या या लढाईत, हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंकण्यासाठी महाराष्ट्र सज्ज...', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ दिली. अजित पवार सत्तेत महायुतीत सहभागी झाले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांबरोबर ठामपणे उभे राहिले. या काळात त्यांच्यावर 'ईडी'ची कारवाई देखील झाली. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात त्यांच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे वजन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT