Sunetra Pawar Rupali Chakankar Resignation sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, रुपाली चाकणकरांना धक्का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत!

Sunetra Pawar: रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उमटला. त्यानंतर चाकणकरांच्या राजीनाम्याविषयी एकमत झाले.

Roshan More

NCP News : रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजून एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्याकडे आहे. मात्र, त्या पदाचा देखील राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्याकडून घेणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सुनेत्रा पवारांचे निवास्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याची चर्चा होती. मात्र, देवगिरीवर झालेल्या बैठकीत चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. या बैठकीत चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा सूर उमटला.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत होते. हे प्रकरण एका वर्षापूर्वीच उघड झाले असते मात्र त्यांनी पोलिसांवर तसेच पत्रकारावर दबाव आणल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर त्यांनी वैयक्तिक कारण देत महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी नाशिक महिला राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेकडून करण्यात येत होती. त्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नव्हते. नाशिकमधील काही वरिष्ठ नेते चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत आग्रही होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत एकमत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT