Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची धडधड वाढली, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, निर्णयही ठरला!

Rupali Chakankar NCP Sunetra Pawar Praful Patel : रुपाली पाटील चाकणकर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी पक्षातूनच होत आहे.
Rupali-Chakankar
Rupali-ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : अशोक खरात प्रकरणानंतर वाढत्या दबावामुळे वैयक्तिक कारण सांगत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. आता त्यांच्याकडे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, यांची या पदावरून देखील हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवास्थान देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेत्यांची बैठक झाली. सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत अशोक खरात प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा घ्यायचा की नाही याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, असा सूर राष्ट्रवादीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

Rupali-Chakankar
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

महिला आयोगाचा राजीनामा

रुपाली चाकणकर यांनी आपला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला होता. शनिवारी या राजीनाम्यावर निर्णय घेत त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे . दरम्यान, आपल्या विषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचे चाकणकर यांनी राजीनाम्यानंतर सांगितले होते.

सहआरोपी करण्याची मागणी

रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या काळ्या कृत्यांबाबत माहिती होते. त्यांनी पोलिसांवर दबाव आणून त्याच्या विरोधात पूर्वी गुन्हे दाखल होऊ दिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर यांना देखील सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला नेता रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

Rupali-Chakankar
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com