Harshwardhan Sapkal  Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : साडेतीन वर्षे काय केलं? सपकाळ यांनी मागितला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे 'केआरए'

Congress new executive committee : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन कार्यकारिणी करण्याआधी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे.

Aslam Shanedivan

Pune News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कामाला लागले आहेत. त्यांना नवीन कार्यकारिणी तयार करायची आहे. यासाठी झाडाझडती घेतली जात आहे. याकरिता नाना पटोले यांच्या कार्यकारिणीत सुमारे साडेतीन वर्षे पदाधिकरी असलेल्यांनी काय कामे केली? याची माहिती त्यांच्याकडून मागण्यात आली आहे. हे बघता नवीन कार्यकारिणी करताना कामाच्या लोकांना प्राधान्य दिले जाईल असे दिसते.

सपकाळ यांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून सविस्तर माहिती अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहे. पद, कार्यकाळ या दरम्यान केलेली कामे, पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, संघटनात्मक स्थिती, विशेष कार्य आदीचा लेखाजोखा जुन्या पदाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. उपाध्यक्ष, सरचिटणीस व सचिव असे सुमारे दोन पदाधिकाऱ्यांची टीम नाना पटोले यांच्या कार्यकारिणीत होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून राहूल गांधी यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. याकरिता काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते स्पर्धेत होते. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक नेत्याची निवड केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राज्यात सत्ता नसल्याने आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जाईल, असे बोलले जात होते.

मात्र काँग्रेसने यावेळी संघटनेला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आणि पदग्रहण सोहळा आटोपल्यानंतर सपकाळ यांनी प्रदेश काँग्रेसची रचना कशी राहील, नवे-जुने आणि नेत्यांच्या समर्थकांचा कसा समतोल साधला जाणार, याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी सोमवारी जिल्हाध्यक्ष व मंगळवारी प्रदेश पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली. दोन्ही स्वतंत्र बैठकांमध्ये त्यांनी संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला.

तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याची सूचना केली. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून सविस्तर माहिती मागवली असल्याने अनेक निष्क्रिय पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा आटोपल्या असल्याने सपकाळ यांनी आता संपूर्ण लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. याकरिता जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांचे विषय तर शहराध्यक्षांना आपआपल्या शहरातील प्रश्न घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी तीन मार्चला सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT