Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, 'गैर काय....'

Ravindra Dhangekar Congress Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकरांच्या व्हाॅट्सअप स्टेट्सवरून चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले, रिल टाकण्याचे माझ्या मनात होते. शिवजयंतीचे वातावरण होते आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता.
Ravindra Dhangekar  Harshwardhan Sapkal
Ravindra Dhangekar Harshwardhan Sapkal sarkarnama
Published on
Updated on

Harshwardhan Sapkal News : रवींद्र धंगेकर यांनी भगवे उपरणे गळ्यात घातलेले व्हाॅट्सअप स्टेट्‍स ठेवले होते. त्यांच्या या स्टेट्‍सनंतर ते काँग्रेसला राम राम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. रवींद्र धंगेकर यांनी देखील दोन दिवसांत कार्यकर्त्यांना बोलावून आपली दिशा ठरवणार असल्याचे म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, रवींद्र धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहेत. ते कोठेही जाणार नाहीत. ते काँग्रेसकडून तीन निवडणूका लढले आहेत. त्यांनी व्हाॅट्सअपला भगवे उपरणे असलेले स्टेट्‍स ठेवले तर त्यात गैर काय आहे. भगवा रंग हा महाराष्ट्र धर्माची ओळख आहे.

Ravindra Dhangekar  Harshwardhan Sapkal
Eknath Shinde : दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला एकनाथ शिंदेंचा खास संदेश; म्हणाले, 'साहित्य संस्कृतीचा गजर...'

सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवर देखील चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.बुलढाण्यात अफूची शेती पकडली गेली. ती राज्यातील सगळ्यात मोठी कारवाई होती. या मागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्टेट्सवर स्पष्टीकरण

रवींद्र धंगेकरांच्या व्हाॅट्सअप स्टेट्सवरून चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले, रिल टाकण्याचे माझ्या मनात होते. शिवजयंतीचे वातावरण होते आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. गळ्यात भगवा रुमाल होता. त्या फोटोवरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि वातावरण असे झाले की, मी शिवसेनेत चाललो आहे. भगव्या उपरण्यातच जन्म झाला आहे.

Ravindra Dhangekar  Harshwardhan Sapkal
PM Narendra Modi News : गुलामीची मानसिकता..! अखेर मोदींनी संधी साधली, विरोधकांवर चढवला हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com