Deputy Cm Ajit Pawar- Prakash Dhariwal  Sarkarnam
महाराष्ट्र

'पुढच्या वेळी अजितदादा मुख्यमंत्री होऊन या'

सरकारनामा ब्युरो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते आज सकाळी शिरुर नगरपरिषदेच्या (Shirur Municipal Council) नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. खरंतर उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची होती, पण अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापत आपल्या वक्तशीपणाचे उदाहरण दिले. यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, उद्योजक प्रकाश धारीवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे उपस्थित होते.

उद्घाटनानंतर त्यांनी शिरुर नगरपालिकेच्या नव्या इमारतीची अगदी बारकाईने पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी बांधकामाविषयी कोणतीही तक्रार न केल्याने उपस्थितांसह, कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी "तुमच्यामुळे शिरुरमधील जमिनीच्या किमती वाढल्या,'' असे म्हणत माणिकचंद ग्रुपचे संचालक नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल टोला लगावला. पण, पुढच्या वेळी अजित दादा मुख्यमंत्री होऊन नगरपरिषदेला या..! अशी साद भर सभेत उद्योजक आणि माजी उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी घालताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अशी आहे शिरुर नगरपरिषदेची नवी इमारत

शिरूरपासून पुणे-नगर रस्त्यावर पाबळ फाट्याजवळ शिरूर नगर परिषदेची नवीन तीन मजली प्रशासकीय इमारत बाधंण्यात आली आहे. नगरसेवक विजय दुगड यांनी या इमारतीची संकल्पना मांडली. या इमारतीचे सर्व कामकाज नुकतेच पूर्ण झाले आहे. जनरल बोर्ड मिटींगसाठी उभारण्यात आलेले भव्य व अद्ययावत सभागृह हे या नवीन इमारतीचे खास आकर्षण आहे. ही नवी इमारत बांधण्यासाठी सुमारे 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या इमारतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व अद्ययावत दालने आहेत. याशिवाय सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालने बनविण्यात आली आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीमधील सर्व कामकाज संगणकीकृत असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT