Ahilyananagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थित अहिल्यानर येथे नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार निलेश लंके यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार लंके यांनी 2029 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मला सहा महिने पालकमंत्री करा, सहा महिने गृहमंत्री करा, मग बघा सगळ्यांच्या बत्त्यागुल केल्या नाही तर बघा असे म्हणत, भर कार्यक्रमातच त्यांनी सत्ताधारी नेतेमंडळींना इशारा दिला.
सत्कार समारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे खासदार निलेश लंके यांनी सहा महिने मला पालक मंत्री करा अन् सहा महिने गृहमंत्री करा अशी इच्छा व्यक्त केली. “पोलीस लोक खूप त्रास द्यायचे, मी त्यांना सांगितले थांबा जरा सरकार येऊ दे. सहा महिने मला पालकमंत्री करा अन् सहा महिने गृहमंत्री करा. गृहमंत्री जाऊद्या पण मला सरकार आल्यावर सहा महिने पालकमंत्री करा. मला शिर्डीतून वाँग वाँग करत नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचे आहे,” अशी इच्छा खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
'शिर्डीतून नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचे आहे. या दोन चकरा मारल्या अन् मला घरी जा म्हटले तर घरी जाईन तुम्हालाही माहिती आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर एकवर्ष आधी विधानसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तुम्ही मला फक्त दोन चकरा शिर्डी ते नगर अन् नगर ते शिर्डी मारायला दिल्यानंतर गाडी सोडून एसटीने यायला सांगितले तरी मी येईन, असे निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी स्पष्ट केले.
त्यासोबतच पुढे लाल दिव्याच्या गाड्या अन् मागे लाल दिव्याच्या गाड्याचा ताफा. कलेक्टर साहेब डायऱ्या घेऊन माझ्या मागे, असे म्हणत साहेब हसले म्हणजे करतील, अशी मिश्किल कोपरखळीही त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना लगावली. 2029 ला आपले जुळेल, म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, असे म्हणत सगळ्यांचा हिशोब चुकता होईल, असा इशाराही यावेळी निलेश लंके यांनी दिला. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने नेतेमंडळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.