Nitesh Rane News : अयोध्यातील राम मंदिरातील चोरी प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी 'रामरक्षा' आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या (शनिवारी) नागपूरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, खरे हिंदुत्ववादी असाल तर आंदोलनात सहभागी व्हा, असे पत्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. आता त्यावर मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांना पत्र लिहीत प्रत्युत्तर दिले आहे.
राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'संजय राऊतजी, आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला. प्रभू श्रीरामाच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला. जे प्रभूश्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागला? रामरक्षा पाठ असणे तर दूर, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पानं आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले देवेंद्रजींना सल्ले द्यायला... लाज वाटायला पाहिजे.'
'आधी काही करायचे असेल तर रामाच्या नावाने राजकारण बंद करा. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात कवडीचा सहभाग तुमचा नव्हता, ना उद्धव ठाकरेंचा सहभाग होता. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खावून तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक देवेंद्रजी आहेत.', असे देखील त्यांनी म्हटले
'तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते देवेंद्रजी आहेत. रामाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून पुळका दाखवू नका. किमान रामाच्या नावाने राजकारण करु नका.नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत कलेल्या पापांची माफी मागा. डर्टी संजय राऊत'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.