

Pune News : देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिर चोरीप्रकरणाचा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीए आणि राज्यातील महायुती सरकारवर या राम मंदिरातील चोरीप्रकरणी विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभरात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी बुधवारी(ता.15 जुलै) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील रामरक्षा आंदोलनासोबतच संपूर्ण पुणे शहरात पुढील 'रामरक्षारथ' फिरवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे म्हणाले, पुण्यात गुरुवारी (ता.16) रामरक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कसबा गणपती मंदिरासमोरून आम्ही रामरक्षा आणि आरती सुरू करणार आहोत. याचवेळी त्यांनी आम्ही 'रामरक्षारथ' हा संपूर्ण शहरभरात फिरवण्यात येणार असल्याचं माहिती दिली आहे.
पुणे शहरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात आमचा रामरक्षा रथ फिरणार आहे. चार दिवस शहरातील 8 विधानसभा मतदारसंघात हा रथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे फिरवण्यात येणार आहे. यात कारसेवक आणि जुने शिवसैनिक यात सहभागी असणार असल्याचंही मोरे यांनी यावेळी सांगितलं.
तसेच पुणे शहरभरात 'रामरक्षा रथ' फिरवण्यात येणार असल्याच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार व फायरब्रँड नेते संजय राऊत हे उपस्थित राहणार आहे. खरंतर ते या आंदोलनाच्या सुरुवातीलाच येणार होते. मात्र,त्यांना नागपूरला जावे लागले.त्यामुळे आता ते समारोपाला येणार असल्याचं मोरे यांनी यावेळी म्हटलं.
माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना पक्षातील त्यांच्या खासदार, आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अयोध्येतील राममंदिर चोरीया मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत भाजप तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारविरोधात राजकीय वातावरण तापवण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन छेडलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात येत्या 18 जुलै रोजी ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपविरोधात अयोध्येतील राममंदिर चोरी प्रकरणाचा मुद्दा तापवला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वत: नागपूर येथील राम मंदिरात जाऊन पाहणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.