Nitesh Rane Sarkarnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी; संजय राऊत यांच्या विरोधात बोलणे भोवणार?

Mahayuti setback News : संजय राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत विधान केल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामा ब्युुरो

Mumbai News : भाजपचे नेते व राज्याचे मंत्री नितेश राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोर्टाने शनिवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट काढले असल्याचे समजते. संजय राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत विधान केल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात याबाबत नितेश राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने वॉरंट काढले असल्याचे समजते.राणे यांच्या शासकीय निवास स्थानाच्या पत्त्यावर हे वॉरंट काढण्यात आले आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले होते. दोन वर्षापूर्वी नितेश राणे यांनी हे विधान केले होते. त्याबाबत संजय राऊत यांनी माझगाव कोर्टात नितेश राणेंविरोधात मानहानी याचिका दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु असताना सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नितेश यांच्या विरोधात कणकवलीतील निवास्थानाच्या पत्त्यावर यापूर्वीच वॉरंट काढण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यापासून कणकवली पोलिसांनी वॉरंटची अंमलबजवाणी केली नसल्याची ही बाब संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे शनिवारी न्यायालयाने त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास स्थानाचा पत्त्यावर वॉरंट काढले आहे. त्यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणे कोर्टाला काय उत्तर देणार?

दरम्यान, या प्रकरणावर नितेश राणे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वॉरंट आल्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) कोर्टाला काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे. वॉरंट नंतर तरी नितेश राणे कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT