Eknath Shinde Shivsena Split : एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडण्यात येणार, ठाकरेंसारखाच 'गेम', मोठ्या नेत्याचा धक्कादायक दावा; भाजपकडे बोट?

Eknath Shind BJP Atul Londhe : उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या प्रमाणे फोडण्यात आला. त्याच प्रमाणे एकनाथ शिंदेंचा पक्ष देखील फोडण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti Politics : भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसनेते अलबेल नसल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर भाजपकडून शिंदेंना टार्गेट केले जात आहे. तर, शिवसेनेचेन नेते देखील भाजपला प्रत्युत्तर देत आहेत. यामध्येच काँग्रेस नेत्याने एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडण्यात येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दावा केला की, ज्या प्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली होती आणि महायुती झाली. त्या महायुतीची महा महा फोड होणार आहे. अशी माहिती येते आहे ठाकरेसेने प्रमाणे शिंदेसेनेची देखील फोडण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्र्यांमध्ये एक वाॅर सुरू आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र हा याच्या कुत्र्या मांजराच्या लढाईमध्ये अडकला आहे. आणि शेतकरी, महाराष्ट्र यामध्ये पिचून निघतो आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिवसेना-भाजपमधील वाद मिटणार! एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले स्पष्ट आदेश; म्हणाले...

भाजप-शिवसेनेत नेमका वाद काय?

नुकत्याच झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत तीनही जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांचा विजय झाला. यावरून भाजप प्रवक्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एक जाग अधिक हवी या हव्यासापोटी हा पराभव महायुतीला पत्कारावा लागला, असा दावा केला. त्यावरून भाजप प्रवक्त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कठोर शब्दात टीका केली.

Eknath Shinde
Eknath Shinde : फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शेवटचा इशारा, 'कर्जासाठी तगादा लावला, तर खडी फोडायला जाल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.