Nitin Gadkari Sarkarnama
महाराष्ट्र

Nitin Gadkari Video : नितीन गडकरींनी का मागितली माफी? म्हणाले, 'तीन किलोमीटरसाठी...'

Nitin Gadkari BJP Nagpur Airport : एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार कंपनीला दिला आहे.

Rajesh Charpe

Nitin Gadkari News: नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाची पाहणी केली. तसेच यावेळी नागपूरच्या जनतेची माफी मागतो असे म्हणाले.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विक्रमी वेळत देशभरात रस्त्याचे जाळे विणले आहे. रस्ते निर्मितीचा वेगही त्यांनी दुप्पट केला आहे. मात्र त्यांच्याच शहरात नागपूर विमातनळावरील धावपट्टीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा ‘अल्टिमेटम’ गडकरी यांनी कंत्राटदाराला दिला आहे. डिसेंबर 2023 मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या कारपेटिंगची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १ मे 2024 ला के. जी. गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या.

धावपट्टीच्या कामामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागपूर विमानळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत गडकरी यांनी धावपट्टीच्या कामाची सोमवारी पाहणी केली. यावेळी आमदार मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, मिहानच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, विमानतळ प्राधिकरणारे अधिकारी तसेच के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कंपनीला मे 2024 मध्ये कार्यादेश मिळाल्यावर जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. पहिल्या लेअरचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम पूर्ण होण्यासाठी 21 मे 2025 पर्यंतचा कालावधी लागेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

गडकरी यांनी धावपट्टीचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी आणखी पाच महिने सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागणे योग्य नाही, याकडेही मिहान व कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट इशारा गडकरी  यांनी  दिला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT