NCP Politics : ...तर मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करेन; शरद पवारांच्या आमदारांचे मोठे विधान

Sharad Pawar MLA Statement : शरद पवार हे लढाऊ नेतृत्व आहे. त्यांनी अनेक जय-पराजय पाहिले आहेत. एक तत्व घेऊन चालणारा निधड्या छातीचा तो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे. कोणीही सोबत नसले तरी शरद पवार हे चालत राहतील
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 December : उत्तम जानकर यांना सामावून घेण्याएवढं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मोठं आहे का?, हे तपासून पाहावं लागेल. तेवढं मोठं नेतृत्व असेल तर मीही अजित पवार यांच्यासोबत जाईन. पण, अजितदादांची नेतृत्वक्षमता मला तपासावी लागेल, असे विधान माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले.

ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सर्वांना सांभाळून घेण्याची ताकद आहे का, त्यांची तेवढी नेतृत्वक्षमता आहे का? उत्तम जानकरांना सांभाळून घेणारा अजून कोणता नेता तयार झालेला असेल, असं मला तरी वाटत नाही. माझं मलाच एक दिवस तयार व्हावं लागेल. पण आम्ही शरद पवारांच्या इच्छुनेसार काम करत राहू.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे अजित पवार यांना भेटत असतील तर त्यात काहीही वावगं नाही. काहींचे संबंध असतात, तर काहीजण कामानिमित्त अजित पवारांना भेटले असतील. राजकारणात भेटीगाठी होत आहेत, असा दावाही उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केला.

Sharad Pawar-Ajit Pawar
Guardian Minister : नागपूरचा पालकमंत्री कोण होणार? एकच नाव आघाडीवर....

जानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. पण अशा चर्चांना महत्व नसते. शरद पवार हे लढाऊ नेतृत्व आहे. त्यांनी अनेक जय-पराजय पाहिले आहेत. एक तत्व घेऊन चालणारा निधड्या छातीचा तो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे. कोणीही सोबत नसले तरी शरद पवार हे चालत राहतील.

मारकडवाडीच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी, आरओ, हे प्रशासकीय आकडेवारी सांगतात. पण आमची मतं कुठं गेली, असा मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. ईव्हीएम राहू द्या; पण व्हीव्हीपॅटची चिठ्ठी थेट मशीनमध्ये पडण्याऐवजी मतदारांच्या हाताने टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जानकर यांनी केली.

Sharad Pawar-Ajit Pawar
Chhagan Bhujbal : फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला जाणार; अमित शाहांशी चर्चा करणार!

ते म्हणाले, येत्या पाच जानेवारीला उद्धव ठाकरे, तर दहा तारखेला राहुल गांधी मारकडवाडीत येणार आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही येण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यांचा दौरा अजून निश्चित झालेला नाही. राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही येणार आहेत. मारकडवाडीच्या ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com