Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

OBC Chalo Delhi : ओबीसी नेते आक्रमक, 'चलो दिल्ली'ची घोषणा, देशव्यापी आंदोलनाची तयारी!

OBC Organisations Meeting Vijay Wadettiwar : १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत सुमारे ६५ ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरु झाली.

Roshan More

OBC News : जातिनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज दिल्लीकडे जाणार आहे. आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी आज विदर्भस्तरीय ओबीसी नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी एक नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा देण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही मागणी आहे. सरकारने जनगणनेच्या प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना होणे अत्यावश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

१३ सप्टेंबर रोजी दिल्लीत सुमारे ६५ ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरु झाली. दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्तं तालुका स्तरावर सत्याग्रह, २५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे आणि त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली'चा नारा देत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

जरांगेंसाठी घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास होईल...

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये आश्वासने आणि कागदपत्रांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आता जरांगे यांनी मांडलेल्या मागण्यांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT