Vijay Wadettiwar News : ओबीसींनो आतातरी जागे व्हा, सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवार संतापले

Reservation Open OBC : सरकारने आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत ओबीसींनो आतातरी जागे व्हा, असे आवाहन केले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Reservation News : महाराष्ट्र सरकारने नोकरभरतीमध्ये राखीव वर्गातील तरुणांनी फीची सवलत वगळता इतर सवलत घेतली असल्यास खुल्या प्रवर्गातून दावा करण्यात येणार नसल्याचे निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

एक्सवर पोस्ट करत ते म्हटले आहेत की, 'मतं बहुजनांची, पण निर्णय मात्र त्यांच्याच विरोधात! राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. हीच का तुमची बहुजन हिताची धोरणं? हा निर्णय म्हणजे आरक्षण विरोधी मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे.'

'निवडणुका आल्या की ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते, ओबीसी आमचा DNA आहे असं म्हणणारे मुख्यमंत्री सत्तेत आले की ओबीसींच्या हक्कांना नख लावण्याचं काम पद्धतशीरपणे करतात. हा विश्वासघात आहे.', अशी टीका त्यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Pune BJP : पुण्यातील भाजप नेत्याला उपरती; रुग्णालयाला दिलेले वडिलांचे नाव काढले, CM फडणवीस उद्घाटनाला आले अन्...

'मनुवादी मानसिकतेच्या पक्षांना मागासवर्गीय समाज फक्त 'व्होट बँक' म्हणून हवा असतो. निर्णय प्रक्रियेत आणि हक्कांच्या वाट्यात मात्र त्यांना नेहमीच बाजूला सारलं जातं. पडद्यामागून आरक्षण विरोधी धोरणं राबवून बहुजनांचं अस्तित्व संपवण्याचा हा एक आत्मघातकी डाव खेळला जात आहे.', असा आरोपही त्यांनी केला आहे.

आता तरी जागे व्हा...

विजय वडेट्टीवर यांनी सरकारव टीक करताना ओबीसींनो आतातरी जागे व्हा, असे आवाहन देखील केली आहे. मुळात सरकार आरक्षित जागांचा बॅकलाॅग भरत नसताना असा निर्णय घेते आहे तो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे, अशी टीका देखील सरकारवर करण्यात येत आहे.

Vijay Wadettiwar
Sugar Industry Crisis : धर्माच्या राजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्न हरवले; साखर निर्यातबंदीवरून बाळासाहेब थोरातांचा केंद्रावर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com