Chandrashekhar Bawankule stated that the OBC sub-committee will handle the verification of Kunbi certificates across Maharashtra to ensure transparency. sarkarnama
महाराष्ट्र

Kunbi Certificates : कुणबी प्रमाणपत्रांची पडताळणी ओबीसी समिती करणार, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

OBC Sub-Committee Chandrashekhar Bawankule : हैद्राबाद गॅझेट संदर्भातील जीआर नंतर खोटी प्रमाणपत्र निघत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे.

Roshan More

Chandrashekhar Bawankule News : सरकारने हैद्रबाद संदर्भात जीआर काढून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ओबीसी नेते या जीआर विरोधात आक्रमक आहेत. त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या जीआर विषयी नाराजी व्यक्त केली. तसेच खोटे दाखले, तसेच खाडाखोड करत जातप्रमाणपत्र दिले जात असल्याचा आक्षेप घेतला.

बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना, 'ओबीसी नेत्यांचे म्हणणे बैठकीत ऐकुण घेण्यात आले. काही खोटे दाखले अधिकाऱ्यांनी दिल्याचे तसेच खाडाखोड करून दाखले दिल्याचे भुजबळांनी बैठकीत मांडले. संबधित अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र दिले, खोडतोड करून खोटं जात प्रमाणपत्र काढले जात असेल, अधिकारी ते देत असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत दिले आहेत.'

'कुठल्याही समाजावार अन्याय होणार. मराठा-ओबीसी समाजाचा कुठलाही संघर्ष होणार नाही. ओबीसींच्या ताटातलं कोणीही घेणार नाही, याची काळजी शासन ही घेईल. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. कुठलेही खोटे प्रमाणपत्र इश्शू होणार नाही. खोटा प्रमाणपत्र काढले तर कारवाई करू.', असे आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिले.

'मराठवाड्यात खोटे प्रमाणपत्र आले आहेत त्यावर श्वेत पत्रिका काढा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. त्यावर आमची ओबीसी सब कमिटी आहे ती प्रातांकडून, तहसीलदारांकडून कुठले प्रमाणपत्र,किती प्रमाणपत्र दिली याची माहिती मागवू. त्यावर आम्हाला खाडाखोड झाली आहे, खोटे प्रमाणपत्र इश्शू झाले आहे असे समजले तर त्यावर अंतिम निर्णय शासन घेईल. मात्र, त्याआधी ओबीसी उपसमिती पडताळणी करेल की खरेच खोटे जातप्रमाणपत्र इश्शू झाले आहे का?', असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी ओबीसी उपसमिती करेल, असे संकेत दिले आहेत.

वडेट्टीवार आंदोलनावर ठाम

बैठकीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आमच्या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आमची मुख्य मागणी दोन सप्टेंबरचा जीआर रद्द करा, किती जातप्रमाणपत्र दिली याची श्वेतपत्रिका काढा, अशी होती. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा मोर्चा १० ऑक्टोबर रोजी निघणारच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT