Bacchu Kadu Politics: ...तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमधून बाहेर पडू देणार नाही!

Bacchu Kadu agressive on loan waiver, appeal farmers should unite, warns Devendra Fadnavis -शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर माजी राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आक्रमक मूडमध्ये, सरकारला दिला थेट इशारा
Bachchu Kadu & Devendra Fadnavis
Bachchu Kadu & Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu News: प्रहार संघटनेचे नेते, माजी राज्यमंत्री बच्चू कडू कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहे. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बागलाण येथे शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात आक्रमक माजी राज्यमंत्री कडू यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सर्व मतभेद विसरून शेतकरी एकत्र आले नाही तर, आगामी काळात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

महायुती सरकारने कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्याच्या आश्वासन दिले होते. आता मात्र या प्रश्नावर राजकारण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Bachchu Kadu & Devendra Fadnavis
Eknath Shinde : भाजप सुद्धा कान लावून बसलाय, एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांना काय मंत्र देणार?

शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जीवन मरणाचा विषय बनली आहे. राज्यभरामध्ये अतिवृष्टीने शेती आणि शेतकरी दोघेही संकटात आहेत. यावेळी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्जमाफी होत नसेल तर, हे सरकार काय कामाचे? असा प्रश्न कडू यांनी केला.

Bachchu Kadu & Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीस नाशिकच्या कुंभमेळ्याला करणार प्रयागराजपेक्षाही मोठा उत्सव?

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकतो. मात्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जगु देत नाही. सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक हवालदिल आहे. केंद्र शासनाची नाफेड ही संस्था भ्रष्टाचारात अडकली आहे. नाफेड शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर त्यांच्या मरणासाठी काम करते, गंभीर आरोपही कडू यांनी केला.

माजी राज्यमंत्री कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या २८ ऑक्टोबरला नागपूर शहरात कर्जमाफीसाठी शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह आणि बैलगाड्यांसह सहभागी व्हावे. सरकारने मागणी मान्य केली नाही तर नागपूर शहर जाम करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर शहरातून बाहेर देखील पडू दिले जाणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com