Sadabhau khot on Chhagan Bhujbal .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Sadabhau Khot News: आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री भुजबळांना फटकारलं; म्हणाले, 'समाजाची माथी कशासाठी भडकवता?'

Sadabhau Khot Vs Chhagan Bhujbal : अलिकडच्या काळात महाराष्ट्राची वाटणी जातीपातीमध्ये व्हायला लागली आहे असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला. ते म्हणाले,आरक्षण म्हणजेच आमच्या जीवातील बदल होण्याचा मार्ग अशी स्थिती काही लोकांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे.

Deepak Kulkarni

Sangli News: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील बेमुदत उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयासह अनेक मागण्या मान्य केल्या. यानंतर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचवरुन सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भुजबळांना फटकारलं आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांच्या सरकारविरोधातील घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर रोखठोक विधान केलं आहे. ते म्हणाले, संपूर्ण मराठा समाज OBC मध्ये येणार नाही, हे दोन्ही बाजूच्या नेत्यांना चांगलं माहिती आहे. आरक्षणाचा विषय सोडवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) सरकारने नेमलेल्या उपसमितीवर त्यांचा विश्वास नाही का? हे त्यांनी स्पष्ट करावं. समाजाची माथी कशासाठी भडकवता ? असा सवालही खोत यांनी भुजबळांना केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी,असंही त्यांनी सांगितलं.

अलिकडच्या काळात महाराष्ट्राची वाटणी जातीपातीमध्ये व्हायला लागली आहे असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला. ते म्हणाले,आरक्षण म्हणजेच आमच्या जीवातील बदल होण्याचा मार्ग अशी स्थिती काही लोकांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे. प्रस्थापित मराठ्यांनी वेगवेगळ्या जातीचे नेते निर्माण करुन एकमेकांसोबत भांडण्यासाठी इतरांना उभे केल्याची टीकाही खोत यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी विस्थापितांची बाजू घेतली, हे मूळ दुखणं आहे. चक्रव्यूह निर्माण करुन फडणवीस यांना फसवण्यासाठी षडयंत्र आखलं जात आहे. पण फडणवीस हे आडनाव असल्यामुळेच काही लोकांना प्रॉब्लेम आहे. देशमुख, पाटील, पवार आडनाव असतं, तर लोकांनी पायघड्या घातल्या असत्या असंही खोत म्हणाले.

देवाभाऊ माझ्यासाठी सावलीसारखे आहेत. त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार होऊ शकला नसता. देवाभाऊंचे आडनाव फडणवीस आहे म्हणूनच आमच्याकडे पदे आहेत. देवेंद्र फडणवीस हे 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत असं सदाभाऊ खोत म्हणाले.

आपण अपघातानं आणि अपवादानं राजकारणात आलो आहोत, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो, राजकारणात फडणवीसांचा आधार मिळाला.राजकारण करताना कुणाचा तरी आधार लागतो, तो आधार मला देवाभाऊचा मिळाला.

देवाभाऊमुळे हा सदाभाऊ आमदार आणि मंत्री झाला असं खोत म्हणाले. आम्ही खूप हाल खाल्ले आहेत. मुळात आम्हाला या डब्यातच येऊ देत नाहीत. आमची परिस्थिती अशी आहे म्हणून इथे जागा मिळाली. आम्हाला जर कुणी नमस्कार केला नाही, तर आम्हीच त्याला नमस्कार करतो. आमच्याकडे त्याने पाहिलं नाही, तरीही आम्ही त्याच्याकडे पाहत बसतो, अशी टिप्पणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT