Kolhapur ZP: आमदार-खासदार मतदारसंघ आरक्षणानंतरच राजकीय पत्ते खोलणार; अनेकांची सावध चाल

Kolhapur Zilha Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसात मतदार संघ निहाय गट आणि गणावर आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच आमदार आणि खासदार जिल्ह्यातील राजकीय पत्ते जिल्हा परिषदेच्या पटलावर खोलणार आहेत असेच सध्याचे चित्र आहे.
Kolhapur Zp
Kolhapur Zp Sarkarnama
Published on
Updated on

ठळक मुद्दे :

  1. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

  2. अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आमदार-खासदारांनी आपल्या कुटुंबातील महिलांसाठी तयारी सुरू केली आहे.

  3. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत तगड्या उमेदवारांच्या शोधाला वेग आला असून, अंतिम प्रभाग आरक्षणानंतरच नेत्यांचे राजकीय पत्ते उघड होणार आहेत.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय गोटात कमालीची उत्सुकता आहे. या पदासाठी सर्वसाधारण खुला महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असणार याबाबत राजकीय पुढार्‍यांनी, आमदार,खासदारांनी आतापासूनच कमालीची गुप्तता ठेवली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसात मतदार संघ निहाय गट आणि गणावर आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच आमदार आणि खासदार जिल्ह्यातील राजकीय पत्ते जिल्हा परिषदेच्या पटलावर खोलणार आहेत असेच सध्याचे चित्र आहे.

मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषदेच्या राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि पंचायत समिती सभापतीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत उत्सुकता ताणली असताना आता सर्वच राजकीय नेत्यांनी मतदारसंघातील आरक्षणावर नजर ठेवली आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आमदार खासदारांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या घरीच महिला अध्यक्षपदाची संधी प्राप्त झाले आहे.

Kolhapur Zp
Teacher Employment: सर्वोच्च न्यायालयाचा एकच निर्णय,लाखांवर शिक्षकांची झोप उडाली; नोकरी गमावण्याची भीती

आई आणि बहिणींसाठी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, तत्पूर्वी प्रभाग आरक्षणावर अनेकांची नजर आहे. त्यानंतरच राजकीय नेते आपले पत्ते खोलणार आहेत असे चित्र एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.

यापूर्वी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पद भूषवले होते. त्यानंतर आमदार आणि खासदारांच्याच घरात हे अध्यक्ष पद जाणार का? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहे.

Kolhapur Zp
Shivsena News : शिंदेंची आगामी लोकसभेची तयारी सुरु; साडेतीन वर्षे आधीच 7 जणांकडे मोठी जबाबदारी

आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याने महायुतीतील सर्वच पक्ष या पदावर दावा करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आपल्याकडे तगडा उमेदवार असावा याचा शोध सध्या सुरू आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे उमेदवारांसाठी मारामारी करावी लागणार आहे असेच सध्या चित्र आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षपदावर दावा सांगण्यासाठी तगडे उमेदवार प्रत्येक मतदार संघात देण्याच्या हालचाली महायुतीतील तिन्ही पक्षांकडून सुरू आहेत.

Kolhapur Zp
Sangamner politics news : 'स्थानिक'ची उमेदवारी अशी फायनल होणार; खताळांकडून 'गनिमी काव्या'ची तयारी

मावळत्या सभागृहातील आरक्षण पद्धतीवर एक नजर

सर्वसाधारण खुला प्रवर्ग 19

सर्वसाधारण महिला 20

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह) 18

अनुसूचित जाती (5 महिलासंह) 9

अनुसूचित जमाती 1

प्रश्न 1: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणता प्रवर्ग राखीव झाला आहे?
👉 सर्वसाधारण खुला महिला प्रवर्ग.

प्रश्न 2: प्रभागनिहाय आरक्षण कधी जाहीर होणार आहे?
👉 अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत.

प्रश्न 3: अध्यक्षपदासाठी कोणत्या राजकीय आघाड्यांत रस्सीखेच सुरू आहे?
👉 महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत.

प्रश्न 4: यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या नेत्यांनी भूषवले होते?
👉 गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी हे पद भूषवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com