Omraje Nimbalkar News : पवनराजे हत्याकांड प्रकरणातील ९ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे ते हाताश दिसले.
मराठी वृत्तवाहिनी 'एबीपी माझा'शी बोलताना ओम राजेनिंबाळकर म्हणाले, 'इतका मोठा कालावधी या निकालासाठी घेतला. हा निर्णय येत असेल खुपच दुर्देवी आहे.'
'पोलिसांच्या तपासात त्रुटी होत्याच ही वस्तुस्थिती होती, म्हणून तर न्यायालयात रीट करून सीबीआयकडे तपास देण्याची मागणी केली आहे. सीबीआयमध्ये तपास गेला मात्र यामध्ये तीन वर्षांचा वेळ गेला.माझं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. निचकृत्य केले त्यांना शिक्षा व्हावी.', असे त्यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने बोलवलेल्या बैठकीला तसेच संसदीय पक्षाने व्हिप जारी करून देखील ओम राजेनिंबाळकर उपस्थित नव्हते. त्याबाबत त्यांनी सांगितले की, या केसचा निकाल 16 ला लागणार होता. मात्र, तो चार दिवस पुढे गेला त्यामुळे कुठल्याच बैठकीला गेलो नाही.'
ओम राजेनिंबाळकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या बाबत बोलताना मी अजून कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. मी मतदारसंघात जाईल. कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि दोन दिवसांत निर्णय दिवसांनी निर्णय जाहीर करेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.