

Dharashiv News: महाराष्ट्र राज्य हादरवणाऱ्या आणि गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित बहुचर्चित पवन राजेनिंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल हा शनिवारी(ता.20 जून) लागला आहे. न्यायालयानं या हत्याकांडाची सुनावणी करताना माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल म्हणजे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयसाठी मोठा झटका मानला जात आहे. अशातच आता या निकालाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं समोर येत आहे.
तत्कालीन काँग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर आणि त्यांचे चालकाची नवी मुंबईतील कळंबोली येथे 3 जून 2006 मध्ये राजकीय वैमनस्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानं संपू्र्ण राज्य हादरलं होतं. तब्बल 20 वर्षांनंतर, मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टानं या खटल्याचा धक्कादायक निकाल दिला आहे.
मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं शनिवारी पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील आरोप झालेले माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं आरोपींना मोठा दिलासा देतानाच संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचं मत व्यक्त केलं आहे.
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्टासमोर सुनावणी पार पडली. या प्रकऱणी न्यायाधीशांनी सीबीआय व पोलिसांना मोठा झटका देताना तपासावर ताशेरे ओढले.
सीबीआयच्या विशेष कोर्टात निकाल वाचण्यास सुरूवातीला उशीर झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. कारण या सुनावणीसाठी सध्या बिहारच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेल्या मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केलं होतं. पण न्यायालयात एकीकडे निकालाचं वाचन सुरू असताना बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.