onion farmers protest Sarkarnama
महाराष्ट्र

Onion Tax Reduced: मोदी सरकारच्या एका निर्णयाने शेतकरी पुन्हा भरडला जाणार; खासदार सवलतीसाठी भेटले, सरकारनं सवलतीच घटवल्या...

Onion Farmers’ Road Protest Over Export Concession: केंद्र सरकारने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीच्या सवलतीत पन्नास टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Sampat Devgire

Onion Farmer News: कांदा उत्पादक शेतकरी संकटात आला की त्याच्या संकटात नवी भर पडत असते. केंद्रातील सरकारच्या एका निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा भरडला जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांत सरकार विरोधात असंतोष निर्माण होणार आहे.

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे आणि डॉ शोभा बच्छाव गेल्या आठवड्यात कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी सरकारकडे मागणी करत होते. कांद्याचे दर कोसळले यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र या खासदारांना सोमवारी केंद्राने एक निर्णय घेत दणका दिला आहे.

केंद्र सरकारने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परकी व्यापार महासंचालनालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कांदा निर्यातीच्या सवलतीत पन्नास टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

या निर्णयाने भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य कांद्यांची स्पर्धा करण्यात कमी पडेल. या सवलतींचा निर्यातीत मोठा वाटा असतो. यशवंती गटविल्याने देशांतर्गत कांदा आवक वाढेल. परिणामी कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार आहे. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल.

गेल्या एक महिन्यापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते. त्यामुळे शेतकरी आधीच संतप्त झाला होता. याबाबत भाजप नेते पाशा पटेल यांच्या कृषीदर नियंत्रण समितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.

दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना कांदा उत्पादकांची समस्या मांडली. कांद्याचे दर कोसळत असल्याने वर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. संदर्भात सरकारने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारच्या सचिवांची भेट घेतली. खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील खासदार केंद्र सरकारकडे कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी करीत होते. केंद्र सरकारने मात्र एक निर्णय घेत थेट कांदा उत्पादकांवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. या सवलतीचे दर पन्नास टक्के घटविले आहे. त्यामुळे त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. भाजप सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT