

EPFO Pension Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनबाबत मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २०१४ च्या नियमांमध्ये ईपीएफओने दुरुस्ती केली आहे. १२ वर्षांपूर्वीचा नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पुन्हा एकदा लागू केला आहे. २०१४ च्या नियमांमध्ये लादलेल्या अटी, निर्बंध काढण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेतील योगदान पुन्हा एकदा मूळ पगाराशी जोडण्याचा पर्याय लागू केला आहे. नव्या नियमामुळे आता पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर ठरवली जाणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेल्या नवीन बदलामुळे कट ऑफ तारखेपूर्वी जास्त ईपीएस योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.सप्टेंबर २०१४ मध्ये पेन्शनयोग्य वेतन मर्यादा निश्चित केली होती. यानंतर अनेक दिवस याबाबत मत-मतांतरे सुरु होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएफ खात्यात संबधिक आस्थापना आणि कर्मचारी दोघेही पगारातील १२ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा करतात. यामधील आस्थापनाचे ८.३३ टक्के योगदान पेन्शनमध्ये जमा केले जाते. पुढे भविष्यात हेच पीएफ आणि पेन्शनचे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.
ईपीएफओने १ सप्टेंबर २०२४ रोजी मासिक पेन्शन १००० रुपये निश्चित केली होती. याचसोबत सरकारी संस्थेने पेन्शनयोग्य पगार १५००० निश्चित केला. यामध्ये मूळ पगार आणि महागाई भत्त्याचा समावेश आहे.
१५००० रुपयांच्या पेन्शन कॅपमुळे कमाल ईपीएस पेन्शन ७,५०० रुपये निश्चित होते.मूळ पगाराच्या आधारे पेन्शन निवडण्याची परवानगी नव्हती. यामुळे ज्या ईपीएफओ सदस्यांचा पगार आणि डीए १५००० रुपयांपेक्षा जास्त आहे त्याची पेन्शन कमी होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.