BJP  Sarkarnama
महाराष्ट्र

Operation Lotus : पुण्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, तब्बल 22 जण भाजपमध्ये; शरद पवारांच्या आमदार पुत्रासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांच्या हाती कमळ, संपूर्ण यादीच वाचा

Pune BJP PMC Election : भाजपने पुण्यात विरोधी पक्षांना भगदाड पाडत तब्बल 22 हून अधिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. आज मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

Roshan More

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांत सुरुवात होईल. त्याआधीच भाजपने पुणेमध्ये मोठा डाव टाकत विरोधी पक्षांची ताकद कमी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत या पक्षातील दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 22 जण भाजपमध्ये आज प्रवेश करत आहेत.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पुण्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्या वेळ अमावस्य असल्याने हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. आजचा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून त्यासाठी पुण्यातून प्रवेश करणारे नेते कार्यकर्त्यांसाठी लवकरच रवाना होणार आहेत.

आज तब्बल 22 नेत्यांचा प्रवेश होणार असून यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही दिग्गजांचा देखील समावेश आहे. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल त्यांचे पुत्र हेमंत बागुल तसेच सध्या राष्ट्रवादीत असलेले विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे त्यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते यामध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे निष्ठावंत नाराज

या प्रवेशांमुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरून येणाऱ्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने भाजपमधील काही नेते देखील अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, पूर्णपणे नाराजी दूर होऊ शकलेली नाही त्यामुळे या प्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT